कमला नेहरू रूग्णालयातील डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड.

[metaslider id=2853] सनाटा प्रतिनिधी:पुणे शहरातील मंगळवार पेठेतील सरकारी हॉस्पिटल असलेले कमला नेहरू रूग्णालय हे शहराच्या मध्यभागी आहे .या कमला नेहरू रूग्णालयाच्या हाकेच्या अंतरावरच साततोटी पोलीस चौकी आहे .सदरील परिसर हे फरासखाना पोलीसांच्या अखत्यारीत येत आहे.आज सर्वत्र दिवाळीचा सन साजरा होत असताना एका माथेफिरूने कमला नेहरू रूग्णालयामधील पाकिॅंगमध्ये पार्क केलेल्या ११ डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड करून सवॅ गाड्यांच्या काचां फोडण्यात आल्या अशी माहिती मिळाली .अधिक माहिती काढली असता एका सुरक्षारक्षकाने नागरिकाना सांगितलेकी दुसऱ्या सुरक्षारक्षकाने काचा फोडले आहे .त्याचे कारण अजून समजलेले नसून फरासखाना पोलीसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply