झोन 4 चे एसीपी निलेश मोरे यांची बदली ; पत्रकार मारहाण प्रकरण

सजग नागरीक टाईम्स; अजहर खान.
पुणे, माजंरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश भुकेले यांना झोन 4 वानवडी चे एसीपी निलेश मोरे यांच्या कडून मारहाण झाली होती त्याचे प्रसाद दोन दिवसा पासून पुणे शहर मध्ये उमटत होते .सोशल मिडियावर हि कारवाईची मागणी होत होती त्याची दखल घेत रशमी शूूू्कला यांंनी  तातडीने बदली केली आहे विषेश शाखेत बदली झाली आहे त्यांच्या जागी मिलींद पाटील यांची नियुक्ती झाली आहे मोरे यांची बदली तर झाली परंतु त्यांनी केलेल्या मारणहाणी बद्दल अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही एखाद्या नागरीकाने पोलीसांना उलट जरी बोलले तर अधिकारी यांचा ईगो हट्ट होतो व सरकारी कामात अडथळा च्या नावाखाली अनेक प्रकार होऊन जातात परंतु पत्रकाराला मारहाण प्रकरणात अजुन एसीपी निलेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने कायदा हा फक्त नागरीकांन पुरताच मर्यादित असल्याचे दिसून आले कायद्याचे रक्षकच भकक्षक झाल्यावर नागरीकांनी न्याय मागावे तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

Leave a Reply