ट्रॅफिक पोलीसांचा करतोय कबाब ठाण्यातील पोलीसाचा रूबाब

खाकी वर्दीतला पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस..
दोन दिवसा पूर्वी पुण्यातील मध्य भागी असलेल्या पोलीस ठाण्यात एका कामानिमित्त pi यांना भेटण्यासाठी गेलो होतो pi नसल्याने त्यांना फोन केला ते अर्ध्या तासात येणार आहे अशी फोनवर कल्पना दिली मग आम्ही तेथेच बसलो तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलीस आले त्यांच्या हातात काहीतरी शासकीय कागदपत्र होती त्यांना ते जमा करायची होती जमा महणजे इनवर्ड करून घेणारा पोलीस म्हणाला थांबा कि राव तुमच मधी मधी काय आहे बसा तेथे जाऊन.. ते ट्रॅफिक पोलीस आमच्या बाजुला येऊन बसले आणि सारखं आमच्या तोंडाला पाहत होते.
हि बातमी पण वाचा;पुण्यात ७५ वर्षीय रुग्णाकडून डॉक्टरवर चाकूहल्ला
आम्हाला राहिले नाहि त्यांना विचारले काय झाले तुम्ही सारखं आमच तोंड पाहाताय ते ट्रॅफिक पोलीस म्हणाले तुम्ही अजहर खान का जे ट्रॅफिक चे विषय बाहेर काढत असतात आम्ही हो म्हणत थोडीफार गप्पा मारल्या त्या ट्रॅफिक पोलीसांना उशिर होत असल्याने ते परत अर्ज इनवर्ड करण्यासाठी गेले असता इनवर्ड करून घेणारा ठाणे अंमलदाराची सिंगम स्टाईल प्रमाणे सटकली आणि हुज्जत घालून त्या ट्रॅफिक पोलीसाला उद्या या म्हणून परत पाठवले.. ते ट्रॅफिक पोलीस तेथून निघून गेले.
आमहाला हि एक तासा पेक्षा जास्त वेळ गेल्याने हातातील कामे भरपुर असल्याने निघालो अर्ध्या रस्त्यात pi यांचा फोन आला आणि म्हणाले मी आलो आहे या.. आमहाला उशिर झाल्याचे सांगून उद्या येतो महणालो… दुसर्या दिवशी परत पोलीस ठाण्यात गेलो असता ते ट्रॅफिक पोलीस बसलयाचे दिसुन आले त्याना विचार पुस केली असता दोन तासा पेक्षा जास्त वेळ झाला तरी सिंगम अमलदार अर्ज घ्यायला तयार नाही… ओके म्हणत pi यांच्या केबीन मधे जाऊन चर्चा केली आणि आम्ही बाहेर पडलो तर ते ट्रॅफिक पोलीस बसलेलेच मग परत pi यांच्या केबीनला जाऊन ट्रॅफिक पोलीसाची सर्व हकीकत सांगितली व त्या सिंगमवर कारवाई करा.

.pi यांनी सिंगम अमलदाराला बोलावून झडाझडती घेऊन त्याचे चिंगमच केले.. शेवटी शासकीय कागदपत्रे इनवर्ड करून घेण्यात आले .. त्या ट्रॅफिक पोलीसांना विचारले असता ते म्हणाले मी गेल्या तीन दिवसां पासुन चकरा मारतोय परंतु इनवर्ड करून घेण्यास चालढकल केले जात होते आणि हे अताचीच बाब नव्हे तर वारंवार असे प्रकार केले जातात आमच्या लोकांनाची किंमतच करत नाही शेवटी माझे मोबाईल नंबर देऊन काहि अडचण असल्यास फोन करा म्हणून आम्ही निघालो..
सांगायचे तात्पर्य ऐवढेच आहे कि ठाण्यातील पोलीसाचा रूबाब किती दोन्ही पोलीस असताना दोघांत दुरावा का…
मग कधी असेच ट्रॅफिक पोलीसांनी केले तर, अशी अवस्था ट्रॅफिक पोलीसांची असेल तर मग सर्व सामान्यांचे काय हाल होत असतील.

लेखक ; अजहर खान  ,  संस्थापक ;लोकहित फाउंडेशन पुणे 

Leave a Reply