तरुणीने पोलिसाला पोलीस स्टेशनमध्येच धुतले

[metaslider id=2853]

तरुणीने पोलिसाला मारले म्हणून तिच्यावर गुन्हादाखल,  सरकारी गुपित बाहेर काढणाऱ्या विलास जाधववर काय दाखल केले ?
सनाटा प्रतिनिधी :एका महिलेने २०१६ मध्ये तिच्या साथीदाराने लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केला व लग्नास नकार दिल्याने तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात व पोलीस आयुक्तांना तशी तक्रार दिली होती,व त्या तक्रारीचे काय झाले म्हणून तरुणीने पुन्हा पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे याना चौकशीसाठी तक्रार केली होती .

हेपण वाचा :फहद खान यानी अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडीबिल्डिंग मध्ये सहावा स्थान पटकावले

याबद्दल सहाय्यक फोजदार विलास जाधव याने संबंधित तरुणीची माहिती इतरांना व त्याच्या व्यवसायाशी संबंधित लोकाना दिली त्यामुळे तिची बदनामी झाली व व्यवसायात नुकसान उठवावे लागल्याचे आरोप करत  संबंधित तरुणीने सहाय्यक फोजदार विलास जाधव यांना लष्कर पोलीस स्टेशनमध्ये जावून जाब विचारला. यात दोघांमध्ये हमरीतुमरी झाली व तरुणीने सहाय्यक फोजदार विलास जाधव यांना लष्कर पोलीस स्टेशनमध्येच हाताने चोपण्यास सुरुवात केली.याबद्दल लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तरुणीने मारहाण केल्यामुळे तिच्यावर सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकार्याने संबंधित सहाय्यक फोजदार विलास जाधव याने शासकीय गुपित बाहेर आणले व कामात हलगर्जीपणा करत त्या तरुणीची आबरू रस्त्यावर आणली असून त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल केले याची माहितीही देण्यात आली नसून पुढील तपास एस के यादव करीत आहे.

[Not a valid template]

Leave a Reply