पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या अधिकारी वर गुन्हा दाखल

पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या अधिकारी वर गुन्हा दाखल
सनाटा प्रतिनिधी ; पुणे शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यातील  इन्सपेक्टर  कृष्णा खोरे यांच्यावर पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी सनाटाचे मजहर खान यांनी पोलीस दरबारात गुन्हा नोंदवला आहे .मजहर खान हे कामानिमित्त एसीबी मध्ये गेले होते .बाहेर पडत असताना काहितरी आढळल्याचा मोठ्ठा आवाज आला तो काय प्रकार घडला हे पाहण्यासाठी गेले असता. मोटर कार मोटरसायकल वर आदळल्याने अपघात झाल्याचे दिसले . मोबाईल मध्ये याचे चित्रिकरण खान करत असताना कार चालक व मोटरसायकल मालक मध्ये हुज्जत चालू होती .त्या मध्ये कृष्णा खोरे हा संबंधित इसमाला  शिविगाळ करत होते मोबाईल मध्ये चित्रिकरण होत असल्याचे पाहुन खोरे हे  मजहर खान यांच्या अंगावर धाऊन आला व हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल मधील सर्व डाटा डिलिट केले  व  शिवीगाळ व धक्काबुक्की करत  म्हणाले कि पुढे एसीबी कार्यालयात  दिसला तर यादराख तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकविन अशी धमकी हि दिली, 
मजहर खान यांनी खोरेची तक्रार प्रेस कौन्सिल व राज्यपाल व इतरांना  केली होती. त्याची दखल घेत बंडगार्डन पो. स्टेशन मध्ये अदखल पात्र  गुन्हा दाखल करण्यात आला आहे  . 

Leave a Reply