पुणे : कोंढवा तालाब मदरसातून एका अल्पवयीन मुलास पळवून नेले

पुण्यातील कोंढवा तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे .सदरील प्रकरण पुढील प्रमाणे इजाज गौस शेख वय १५ वर्षे हा मुलगा रंगाने सावळा व अंगाने मध्यम ,नाक सरळ ,चेहरा उभट असून याचे सातवी पर्यंत शिक्षण झालेले असून तो मराठी,हिंदी ,उर्दू भाषा बोलतो याच्या अंगात पांढरा कुर्ता व पायजमा  डोक्यात टोपी आहे,व जवळ मौल्यवान वस्तू वा पैसे नाहीत.
 
हे पण जरूर पहा ;सनाटा जाहिरात धमाका 

हा कोंढवातील  तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मदरसातून दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा दरम्यान  पळवून नेले आहे .या संदर्भात त्याची आई रेश्मा गौस शेख वय ३५ ,रा,२४७ सिद्धेश्वर नगर भाग क्र.४ मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर जिल्हा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून याचे कोंढवा पोलीस स्टेशन जावक क्र .४९०५/२०१७ असून या मुला संदर्भात कोणास हि माहिती मिळाल्यास या नंबर वर संपर्क साधावा 9011998777 असे आव्हान करण्यात आले आहे.

 ही बातमी वाचण्यासाठीया लिंक वर क्लिक करा ;कोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला

ही बातमी वाचण्यासाठीया लिंक वर क्लिक करा:पुण्यातील हॉटेलचालकाला एफ डी एचा दणका

[Not a valid template]

 

Leave a Reply