पुणे जिल्हा अधिकारी यांनी बेशिस्त कर्मचाऱ्याला दिला दणका

बेशिस्त कर्मचाऱ्याचे केले डिमोशन,

बातमीदार अजहर खान ; सनाटा न्युज
पुणे, अन्न धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून पदावर असलेले एल एम भांगे हे तहसिल कार्यालय जुन्नर येथे कार्यरत होते त्यांनी नैसर्गिक आपत्तीचे बिल तीन महिन्यांच्या आत सादर करणे गरजेचे असतानाहि पावती पुस्तक व त्याची बिले सादर न करता ते सहा महिने कार्यालयातून विनापरवानगी गैरहजर राहिले होते.
[metaslider id=2538] भांगे यांचे कृत्य हे वरिष्ठांचे हुकुमाची अवमान्यता करणारे, बेजबाबदार असून, शासनाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे वरिष्ठांना निदर्शनात आले. यापूर्वीही भांगे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचे उल्लंघन केल्याने एल एम भांगे यांची वरिष्ठांनी विभागीय चौकशी सुरू करून त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले होते, तरी हि त्यांच्या कामात सुधारणा झाली नसल्याने पुणे जिल्हा अधिकारी यांनी स्वताच्या अधिकाराचे वापर करून एल एम भांगे यांना अव्वल कारकून या पदावरून दोन वर्षा साठी लिपीक पदावर पदावनत केले असल्याचे पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस. 

[Not a valid template]

Leave a Reply