पुणे : पंधरा लाखांचा विमल व आर एम डी गुटखा जप्त

पुणे शहरात पंधरा लाखांचा गुटखा जप्त

सनाटा प्रतिनिधी : पुणे शहर मध्ये राजरोस पणे गुटखा विक्री सुरू असल्याने गुटखा विक्री करणाऱ्या  विरोधात पुणे शहर पोलीसांनी व अन्न व औषध प्रशासन विभागाने मिळून  कारवाई केली आहे संघटीत गुन्हेगारी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना मिळालेल्या खबर नुसार सेनापती बापट रोड वरून गुटखा घेऊन जाणारी महिंद्रा पिकप जिप MH 14 ET 2010 याला आडवले असता त्या मध्ये 8 लाख 31000 हजाराचा विमल गुटखा मिळून आला  महिंद्रा पिकप चालक राजेश चौधरी वय २८ रा.रहाटणी यांचेकडे चौकशी केली असता सदरचा माल हा प्रकाश भाटी वय ३१ रा कोंडवा याचे कडून आणल्याचे समजले   8 लाख 31000 हजाराचा विमल गुटखा व वापरण्यात आलेली  महिंद्रा पिकप जिप MH 14 ET 2010 कि.रु १.५०.०००/जप्त करून अन्न औषधप्रशासन चे के.एल.सोनकांबळे यांचे ताब्यात देण्यात आला.तसेच  प्रकाश चुनीलाल माळी रा.  गोकुळनगर कोंढवा  यांच्या घरातून  5 लाख 39 हजार 880 रूपयांचा विमल गुटखा.आर.एम.डी गुटखा  मिळाला असून सदरील जप्त केलेला गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री .कालिदास शिंदे यांना  सोपविणयात आले आहे सदरील सर्व मालाची किमत बाजार भावा नुसार १५.२०.८८० रु असून ताब्यात घेण्यात आला आहे .सदरची कारवाईत अप्पर पोलीस आयुकत प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुकत पंकज डहाणे, सहाय्यक  पोलीस आयुकत सुरेश भोसले  अन्न व औषध प्रशासन विभागाचे के.एल.सोनकांबळे , श्री .कालिदास शिंदे व ईतर अधिकारी कर्मचारीनी  मिळून केली आहे

Leave a Reply