पुणे म.न.पा.तर्फे सोसायट्यांसाठी खुशखबर

सनाटा न्यूज : पुणे शहरातील सोसायटीतील नागरिकांसाठी एक खुश खबर आहे कि जे लोक सोसायटीत किंवा अपार्टमेंटमध्ये गणपती बसवितात ते  महापालिकेच्या गणेशेत्सव स्पर्धेत भाग  घेऊ शकतात .
पुणे महापालिकेच्या वतीने पुण्यातील सर्व  अपार्टमेंटस् ,सोसायट्यामध्ये गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळांनी सोसायटीच्या वतीने सहभागी होणे आवश्यक आहे.

 या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

त्यासाठी  पुणे  महापालिकेच्या www.morya125.in आणि www.pmc.gov.in या संकेतस्थळांवर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात असलेल्या तपशीलांसह 17 ते 24 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरून जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी श्रीनिवास कंदुल (अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा, मो. 9689931374) किंवा सुनील केसरी (उपायुक्त, पुणे मनपा, मो. 9689931500) यांना संपर्क साधावा, असे आवाहन  पुणे  महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा 

 

Leave a Reply