पुणे लष्कर भागातील बालचमूंनी साकारला ” प्रतापगड “

[metaslider id=2853] सनाटा प्रतिनिधि:पुणे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवरील पतंगे वाड्यातील शिवशक्ती तरुण मंडळाच्या बालचमूंनी ” प्रतापगड ” साकारला. या किल्ल्यावर डोमाने फडकाविणारा महाराष्ट्राचा भगवा ध्वज आकर्षक दिसत आहे.या किल्ल्यावर चोरवाटा,भुयारे,रस्त्यांची वळणे,नाकेबंदी,शत्रूवर मारा करणाऱ्या जागा,तटबंदी,गडाचे वैभव,दरवाज्याची भव्यता,मंदिरे साकारली आहेत.या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मांडण्यात आला.

हेपण वाचा:पुणे ; 123 तोळे सोने चोरणाऱ्यास राजस्थान मधून केली अटक

तसेच तानाजी मालुसरे,शेतकरी,शिपाई,मंदिर,नगरावाला,धनगर,ब्राम्हण,सेवक , भाजीवाला,गवळण,शंकराचे केदारेश्वर मंदिर,प्राणी,तोफ,तलाव आणि पहारेकरी अशी चित्रे मंडळी आहेत .या किल्ल्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दाखवून दिला आहे . बालचमूंनी आपला जीव ओतून हा “प्रतापगड “अप्रतिम सादर केला आहे .
यासाठी शिवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष अंकित परदेशी , विनय भगत , आशिष गावडे , सुनील भगत , शुभम परदेशी , लखन खैरे , करण वाघचौडे , ओंकार गावडे , चैतन्य तापसे , वरूण शहा , प्रथम रोकडे , यश व्हावळ , गौरव साळवी , आर्यन चानपुरा , शुभम सारथे आदींनी परिश्रम घेतले .

[Not a valid template]

Leave a Reply