पुणे ;१२ कुंटणखान्यावर सीलबंदची कारवाई ; कल्याणी देशपांडे हिचा हि रूम सीलबंद करण्यात आला

पुणे ;१२ कुंटणखान्यावर सीलबंदची कारवाई

पुणे शहराचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे शहरामध्ये चालत असलेल्या अवैध धंद्यानवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून .पुणे शहरातील अलपवयिन व अन्यान मुलींकडून वेश्याव्यवसाय चालवत असलेल्या ठिकाणी धाडी टाकून विविध पोलीस ठाण्यात इटपा या कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनकडून व गुन्हे शाखेकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.धाडी टाकलेल्या ठिकाणी पुन्हा वेश्याव्यवसाय सुरु होऊ नये म्हणून सदरील कुंटणखाणे सीलबंद करण्यात आले आहे .सदरील कारवाई पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारान्वय केले असून दोन कुंटण खाणे तीन वर्षासाठी तर  उर्वरित कुंटणखाणे एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले .असून फरासखाना पोलीस स्टेशन अन्वये बुधवार पेठेतील ११ कुंटणखाणे व चतूश्रुंगी पोलीस स्टेशन अन्वये एक कुंटण खाणे सीलबंद करण्यात आले आहे. यापूर्वी आठ कुंटण खाणे बंद करण्यात आले होते .मोक्कात अटकेत असलेली क्ल्यांणी देशपांडे हिचा हि चतुश्रुंगी मधील रूम सीलबंद करण्यात आला  आहे.सदरील कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केली आहे.

Leave a Reply