पुणे ; 123 तोळे सोने चोरणाऱ्यास राजस्थान मधून केली अटक

 [metaslider id=2853] सनाटा प्रतिनिधी : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात १२३ तोळे चोरून चोरटे पसार झाले होते.सदरील गुन्ह्याचा पोलीस हे तपास करत असताना सी सी टीवी फुटेज मिळाले व एका बातमीदारा मार्फत आरोपींची माहिती मिळवली . माहिती झालेकी आरोपी हे पुणे शहरातील विविध बंगल्यामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात .त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता कळाले कि ते सध्या कामावर नाही येत आहे,पुणे पोलिसांचे तपासाचे चक्र वेगात फिरत असताना त्याना कळाले कि सदरील आरोपी हे राजस्थान मधील दातीना गावात लपून बसले आहे .पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून गावात जावून त्याना अटक केले व त्यांच्या कडून ३७.७१.२००.चा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीचे नाव आहे भजनराम  चुन्नाराम लोधा रा.मु.पो.दातीना राजस्थान २)मानकराम बबूतराम थोरी रा.मु.पो.दातीना राजस्थान ,या दोन आरोपीना अटक करण्यात आले आहे.

हे पण जरूर पहा ;पोलिसांनी दाखल केली चप्पल चोरीची तक्रार

[Not a valid template]

या संदर्भात प्रवीण चोरडिया यांनी फिर्याद दिली होती. चोरडिया हे परिवारासोबत बाहेरगावी गेले असताना या चोरांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री २.०० वाजता मार्केट यार्डातील दोन बंगल्याच्या मधून जाऊन पाईपवर चढून बंगल्यात प्रवेश केला व लोखंडी तिजोरी फोडून  १२३ तोळे चोरून पसार झाले होते.सदरच्या गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे ,पोलीस उपनिरीक्षक लोहकरे ,दरोडा प्रतिबंधक पथक, दक्षिण प्रादेशिक विभाग पोलीस उपनिरीक्षक कदम स्वारगेट पो. स्टेशन.पो.हवलदार दिनेश शिंदे ,सज्जाद शेख ,कृष्णा बढे,बापू खुटवड,फुलपगरे ,गबाले व इतरांनी मिळून परिमंडळ २ व सहाय्यक पो.आयुक्त लष्कर विभाग यांचे मार्गदर्शन खाली केले.

Leave a Reply