पुण्यात ७५ वर्षीय रुग्णाकडून डॉक्‍टरवर चाकूहल्‍ला
 अजहर खान सनाटा प्रतिनिधी ; डॉक्टर व पेशंटचे हे नाते विश्वासाचे असून त्या नात्याला दिवसेंदिवस काळीमा लागत आहे. डॉक्टर व पेशंटच्या नात्याला असेच काळीमा लावण्याचे धक्कादायक प्रकार पुणे शहरातील सिह्गड रोड येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात घडले. 
सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी सायंकाळी ७५ वर्षीय रुग्णाकडून उपचार करणाऱ्या डॉक्टवर चाकूने हल्ला करण्यात आला. डॉक्टरने बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून ७५ वर्षीय रुग्णाने हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे . यामध्ये डॉक्टरच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत.
लिंक क्लिक करून पहा सनाटा जाहिरात धमाका ऑफर
[Not a valid template]

डॉ. संतोष आवारी हे बी एच एम एस डॉक्टर असून त्यांच्याकडे ३ ते ४ दिवसांपूर्वी दम्याचा ७५ वर्षीय रुग्ण दाखल झाला होता. या रुग्‍णाला औषधोपचाराने बरे वाटत होते, पण आणखी ३ ते ४ दिवस दाखल करण्याची गरज होती. त्याला दारू सोडल्याचा त्रास होत होता, असे डॉक्‍टर आवारी यांनी सांगितले. डॉक्‍टर आवारी सायंकाळी सिंहगड हॉस्पिटलमध्ये राउंडसाठी त्या रुग्णाजवळ गेले असता त्याने चाकूने हल्ला केला. संबंधित रुग्‍णाला डॉक्‍टरने बिल जास्‍त लावल्याचे कोणीतरी सांगितले होते. त्यामुळे त्याने हल्‍ला केल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. सबंधित रुग्‍णाला मात्र, डिस्चार्ज देण्यात आला नव्हता म्हणून कोणतेही बिल केले नव्हते, असे डॉक्‍टर आवारी यांनी सांगितले.  अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

Leave a Reply