पोलिसांनी दाखल केली चप्पल चोरीची तक्रार

[metaslider id=2853] पुणे : चोरी किंवा दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेण्यासही पोलिसांकडून अनेकदा टाळाटाळ झाल्याचा अनुभव अनेकांना आहे. मात्र, चप्पल चोरीसारख्या किरकोळ गुन्हांची पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याची चौकशी देखील सुरु करतील यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र ही बाब खरी असून पुणे जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. हिंदुस्तान टाईम्सने पीटीआयच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.पुणे ग्रामीण पोलिसांनी चप्पल चोरीच्या या अपवादात्मक गुन्ह्याला गांभीर्याने घेत नोंदही करुन घेतली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल काळेकर (वय ३६, रा. रक्षेवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी आपल्या घराबाहेरुन नवी कोरी चप्पल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली.
[metaslider id=3068]

हे पण जरूर पहा; पुणे ; 123 तोळे सोने चोरणाऱ्यास राजस्थान मधून केली अटक

हे पण जरूर पहा ;सनाटा जाहिरात धमाका

[Not a valid template]

पोलिसांनी आयपीसी ३७९ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याची चौकशी सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.यापूर्वी अशा प्रकारची तक्रार कधी तुमच्याकडे आली होती का? असे पीआय जाधव यांना विचारल्यानंतर कोण कुठली तक्रार घेऊन येईल सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, चप्पल चोरीच्या गुन्ह्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[Not a valid template]

मात्र अद्याप कोणालाही याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.तक्रारदार काळेकर हे खेड तालुक्यातील टाकळकरवाडी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान ही चप्पल चोरीची घटना घडली. काही अज्ञात लोक या वेळेत अपार्टमेंटमध्ये घुसले आणि त्यांनी विशाल यांची ४२५ रुपये किंमतीची काळ्या रंगाची चप्पल चोरून नेली. त्यानंतर काळेकर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. विशेष म्हणजे अंमलदार वाय. एम. गायकवाड यांनी त्यांची तक्रारही दाखल करून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक एस. एम. ढोले करीत आहेत.

Leave a Reply