फहद खान यानी अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडीबिल्डिंग मध्ये सहावा स्थान पटकावले

[metaslider id=2853]

फहद यानी हे यश 181 सेमी प्लस केटेगरीत मि‍ळविल

या गटात स्पर्द्धे च्या टाॅप सहा फायनेलिस्ट मध्ये स्थान मिळविणारा फहद हा एकमेव  भारतीय.

सनाटा प्रतिनिधी: पुणे,  आॅक्टोबर 2017. पुण्याचा स्वतंत्र फिटनेस ट्रेनर फहद खान यानी अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडीबिल्डिंग मध्ये सहावा स्थान पटकावले. फहद यानी हे यश 181 सेमी प्लस केटेगरीत मि‍ळविले. या गटात स्पर्द्धे च्या टाॅप सहा फायनेलिस्ट मध्ये स्थान मिळविणारा फहद हा एकमेव  भारतीय होता. या स्पर्द्धेत भाग घेणारे इतर देश म्हणजे इराण, इराक,कुवैत आणि बहरीन होते. फहद ला ‍िमळालेले यश भारत आणि पुणे दोघांसाठी अभिमानाची बाब आहे कारण की आपल्या देशात पहिल्यांदा पुण्यात  अोलंपियाज अमेच्योर अोलंपिया या स्पर्द्धेचे  आयोजन झाले.

हेपण वाचा : तरुणीने पोलिसाला पोलीस स्टेशनमध्येच धुतले 

अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडी बिल्डिंग स्पर्द्धेच्या 181 सेमी प्लस केटेगरीत सहावा स्थान मिळविणारा फहद म्हणतो- मला या स्पर्द्धे साठी सतत 8 महीने जबर्दस्त तयारी आणि डाइट करावी लागली. या स्तर वर येण्यासाठी दिवसातून दोनदा भी कसून तयारी करीत असे. गेल्या वर्षी म्हणजे 2016 त माझा कार अपघात झाला आणि मला हेयरलाइन फ्रेक्चर देखील झाले. त्या मुळे मला सहा महिन्यासाठी वेटलिफ्टिंग तालमीपासून रजा घ्यावी लागली. या परिस्थितितून बाहेर पडणे नक्कीच कठिण होते. कारण या एक्सीडेंट नंतर  वजन उचलताना मला धाप लागायची. .कसेतरी मी पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केले आणि इतर काही स्पर्द्धांमध्ये भाग घ्यायला लागलो.  या पुर्वी मी बाॅडी पावर एक्सपो 2015 या स्पर्द्धेत भाग घेतला होता अ‍ाणि त्यात टाॅप 10 फायनेलिस्ट्स मध्ये सामील होतो.

[Not a valid template]

फहद पुढे म्हणाला की या यशाचे संपूर्ण श्रेय माझे कोच उमेश मोहिते यांना जातं. मोहिते स्वत. अनेक राष्ट्रीय बाॅडी बिल्डिंग स्पर्द्धेत त्याने  भाग घेतलेला आहे.  या स्पर्द्धेच्या तयारी साठी तर ते माझ्यासाठी मोठा आधार होते.
 विशेष म्हणजे अमेच्योर अोलंपिया सीरीज पहिल्यांदाच भारतात योजिली गेली होती. ही स्पर्द्धा बाॅम्बे एक्झीबिशन सेंटर मध्ये 13 ते 15 आॅक्टोबर पर्यंत सम्पन्न झाली. ह्या ‍इंटरनेशनल बाॅडीबिल्डिंग ची संकल्पना आणि विजन 1965 मध्ये जो वील्डर यानी मांडले. पारंपरिक पुरूष बाॅडीबिल्डिंग बरोबर मेन्स क्लासिक बाॅडीबिल्डिंग, मेन्स फिजिक, वीमेन्स बिकिनी फिटनेस एंड वीमेन फिजिक या  स्पर्द्धाही आयोजित होतात. भारतात पहिल्यांदी झालेल्या या स्पर्द्धेत  अमेच्योर अोलंपिया  हे टायटल जिंकण्यासाठी 40 देशांच्या 200 प्रतिस्पर्द्धकांनी भाग घेतला होता अशी माहिती गौरव सिंग यांनी पत्रा द्वारे सनाटा प्रतिनिधीला दिली .

Leave a Reply