भररस्त्यात स्विफ्ट कार पेटली, तीन प्रवासी जळून खाक

स्विफ्ट गाडीने पेट घेतल्यानंतर बाहेर पळायला वेळ न मिळाल्यामुळे तिघंही जळून खाक झाले.
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील वडगाव आनंदमध्ये स्विफ्ट डिझायर कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच जळून मृत्यू झाला.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

मंगळवारच्या मध्यरात्री दीड वाजता पुण्यातील वडगाव आनंद भागात ही घटना घडली. गाडीतील तिघं जण पुण्यावरुन घरी परतत होते. त्यावेळी प्रशांत चासकर यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर गाडीने पेट घेतला.
गाडीतून बाहेर पडायला वेळ न मिळाल्यामुळे तिघंही जळून खाक झाले. तिघे ही मेडिकल व्यावसायिक असल्याची माहिती आहे. गाडीला आग लागण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गाडीने पेट घेतल्यानंतर शेजारुन जाणारी एकही गाडी आग विझवण्यासाठी किंवा मदतीसाठी थांबली नाही. कोणी प्रयत्न केला असता, तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply