भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यूय

सजग.नागरिक टाइम्स:पुणे, 23 एप्रिल :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट या 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथे दलित आणि हिंदूत्ववादी गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता. या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद एकबोटेंना अटक आणि नुकताच जामीन मिळाला आहे.

या दंगलीची पूजा सकट ही साक्षीदार होती.  तिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आला. पूजा हिचा घातपात झाला असल्याची शक्यता पूजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी केली आहे. एकमेव साक्षीदार असलेल्या पूजाला आणि तिच्या  कुटुंबियांना धमक्या येत असल्याची तक्रार ही त्यांनी केली आहे.

Leave a Reply