मस्जिदिच्या जागेचे रक्षकच बनले भक्षक

 घर को हि आग लग गयी घरके चीरागसे             
पुणेः गुरुवार पेठेतील बाराइमाम मस्जिद समोरील ८३७/८३८ लागुरुवार पेठ खतीजाबी तकिया व कसाबिया मस्जिद मधिल कब्रस्तान मध्ये जूने ट्रस्टी नामे कादर अब्दुल रहमान व ईतरांनी अनधिकृतपने ताबे ठोकून सदरील जागा राहण्यासाठी व कपाट व्यवसायासाठी भाडयाने दिली होती . याच ठिकाणी माजी आमदार अमीनुद्दीन पेनवाले यांची देखील कबर असून या कबरी जवळच अनधिकृतपने ताबे ठोकून व्यवसाय चालू होतेहे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सदरील जागेच्या नविन ट्रस्टींचा मागिल सहा महीन्यापासून टीलकरोड़ क्षेत्रीय कार्यालयातील बांधकाम खात्याकडे पाठपुरावा चालू होता त्यास दिनांक 28 /6/2017 रोजी यश आले असून ते अर्धवटच यश आले आहे.टीलकरोड़ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारींनी दबावाखाली येऊन अर्धवट कारवाई करून पळ काढला असल्याचे ट्रस्टींनी सांगितले.सदरील जागेवर कारवाई होवून जागा मोकळी व्हावी यासाठी अडव्हाक कमीटीचे ट्रस्टि आसिफ रफिक शेख, मुख्तार खान, शकिल शेख,स्थानिक नागरिक उमर शरिफ, समीर शेख, आणि वस्तीतील सभासद व तसेच तहरीक ए औकाफ चे सदस्य व सलीम पटेल, सोहेल शेख, मन्नान यांनी जागा मोकळी व्हावी म्हणून परीश्रम घेतले असल्याचे सांगितले.

 

Leave a Reply