लायन्स क्लबच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

[metaslider id=2853] सनाटा प्रतिनिधी:लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले . वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीमध्ये झालेल्या या आरोग्य शिबिरात स्थानिक रहिवाशी,कामगार वर्ग,घरकाम करणाऱ्या महिलांसाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अग्रसेन डायग्नोस्टिक सेंटर,सुरेंद्रकुमार अग्रवाल मोफत दवाखाना आणि सत्यम ग्रुपने या आरोग्य शिबिरास विशेष सहकार्य केले . या आरोग्य शिबिरात रक्तशर्करा,नेत्र तपासणी,दंत तपासणी, बी. एम. आयद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरासाठी डॉ. शीतल भुतडा , डॉ. किरण नाईक,रवी वानखेडे,अशोक गायकवाड आणि त्याच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले . शिबिरामध्ये २४० जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला .
या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल , सचिव राजेश बंसल , सदस्य उमेश अग्रवाल , त्रिलोकचंद्र अग्रवाल , कुशल अग्रवाल , सुधीर अग्रवाल , सुभाष सिंघल , प्रमोद सराफ आदी मान्यवर उपस्थित होते .
लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारे २४ शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये ५००० पेक्षा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला असल्याचे सनाटा प्रतिनिधीला सांगण्यात आले .

[Not a valid template]

Leave a Reply