विनयभंगाच्या गुन्ह्यांत चोवीस तासांत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश

सनाटा प्रतिनिधी;  दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असुन महिलांना जलद न्याय मिळावे व  अत्याचारात घट व्हावी यासाठी  महिलांवरील विनयभंग  झाल्या प्रकरणी गुन्हेगारावर कारवाई करून चोवीस तासात  दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे असे आदेश पोलिस महासंचालक सतिश माथुर यांनी दिले आहे.
आळंदी येथे एका महिलेचा  विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता . नव्या आदेशानुसार त्याचे दोषारोपपत्र अवघ्या चोवीस तासात दाखल करण्यात आले .अश्या जलदगती निर्णयामूळे आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा झाली अश्या विषयांत लवकर गुन्ह्यांचा निपटारा होऊन महिलांना जास्तीत जास्त न्याय मिळावे असा या मागचा उद्देश आहे ,
 
 
 
 

Leave a Reply