वेश्या व्यवसाय करणाऱ्या मसाज पार्लरवर छापा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या मसाज पार्लरवर छापा

सनाटा प्रतिनिधी ; आज पुणे शहरात अवैध धंद्याला पेव फुटले असले तरी पुणे शहर पोलीसांकडून कारवाई मात्र जोरात सुरू आहे .हेअर अॅनड स्पा ,युनिसेकस मसाज सेंटर शिवनेरी काॅलनी बाणेर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली अवैधपणे  वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली .माहिती मिळताच छापा टाकुन कारवाई करण्यांत आली आहे .त्यात एक  सज्ञान पिडित मुलीची वेश्या व्यवसायातुन सुटका करण्यात आली आहे. मोहिनी अर्जुन दोडके वय 27 याला ताब्यात घेण्यात आले आहे .पिडित मुलींची परिस्थिती गरिबीची असल्याने आरोपीने याचा फायदा घेत नोकरीच्या नावाखाली अवैध वेश्या व्यवसायात ओढल्याचे दिसुन आले आहे.या अनुषंगाने चतुश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत अप्पर पोलीस आयुक्त  पंकज डहाणे, सहाय्य पोलीस आयुक्त संजय पाटिल,व पोलीस निरिक्षक वैशाली गलांडे व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून हि कारवाई केली  असल्याचे सांगितले .                      

Leave a Reply