१५ ऑगस्ट निमित्त पुर्ण पणे सजविली दर्गाह

  १५ ऑगस्ट निमित्त बिबवेवाडीतील हजरत राजाबागशहा शेरसवार वली दर्ग्याला पुर्ण पणे सजविले होते

सनाटा प्रतिनीधी :आज भारतीय स्वातंत्र दिना निम्मित्त पुणे शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करून विविध कार्यक्रम करण्यात आले अनेकांनी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य दिवस साजरे  केले  तर कोणी वाहन चालकांना गुलाबाची फुले दिली .पुणे शहरातील नामवंत संस्था अॅनटी करप्शन सोसायटी तर्फे ध्वजारोहण करून  अॅनटी करप्शनचे अध्यक्ष वाजीद खान ,सागर ओव्हाळ ,रईस खान यांनीं लहान मुलांना खाऊ वाटप केले.  

IMG-20170815-WA0025
IMG-20170815-WA0012
IMG-20170815-WA0018
IMG-20170815-WA0023
IMG-20170815-WA0026
IMG-20170815-WA0031
IMG-20170815-WA0037

पण बिबवेवाडीतील हजरत राजाबागशहा शेरसवार वली दर्गाच्या संस्थेने दर्ग्याला पुर्ण पणे सजविले होते . जणू काही दर्ग्याचा उरुस्च आहे अशे अनेक नागरिकांना वाटले पण ते उरुसासाठी सजविले नसून १५  ऑगस्ट साजर करण्यासाठी सजविलेले असल्याचे जेव्हा कळाले तर नागरिकाना सुखाचा धक्काच बसला . या संस्थेने धर्मान्ध लोकाना विविध शायरी मार्फत  सडेतोड उतर देणारे फलकच लावले होते .तेही आकर्षणाचे विषय बनले होते . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे काँग्रेस चे सरचिटणीस अभयजी छाजेड लहुजी समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष आनिल हातागळे. काँग्रेस चे कार्यकर्ता अलताफ सौदागर.ट्रस्ट चे अध्यक्ष जावेद  शेख.खजिनदार.पंडीत आण्णा आळगीकर. दर्गा ट्रस्ट चे कार्यकर्ते शाहिद शेख आशिष सुर्यवंशी.हाजी आत्तार.हाजी आब्बास भाई.आनिल शिंदे नसीम शेख आदि मान्यवर उपस्थित होते त्या वेळी लहान मुलांना खाऊ वाटप झेंडे वाटप करण्यात आले. .

Leave a Reply