Homeताज्या घडामोडीडायस प्लॉट येथील गुन्हेगाराकडून 09 कोयते हस्तगत:युनिट 2 ने केली कारवाई

डायस प्लॉट येथील गुन्हेगाराकडून 09 कोयते हस्तगत:युनिट 2 ने केली कारवाई

Sajag Nagrikk Times:

पुणे शहरात आगामी होत असलेली अंतरराष्ट्रीय G-20 परिषद त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणतीही अनुचित अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आयुक्तालय हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन आयोजित करून गंभीर गुन्ह्यातील पाहिजे/फरारी, तडीपार, मोक्का मधील पाहिजे/फरार आरोपी तसेच कोयता गॅंग मधील गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने आज रोजी Unit-2 मधील अधिकारी व अंमलदार अशा गुन्हेगारांचा Unit-2 हद्दीत शोध घेत असताना PSI नितीन कांबळे याना मिळालेल्या बातमीवरून स्वारगेट पोलिस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अक्षय अप्पया कांबळे वय- 27 रा. स.न. 429/30, डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे हा त्याचे राहते घरासमोरील कॅनॉल चे कडेला अंधारात हातात एक बारदाना (गोणी) धरून संशयितरीत्या लपून पाहत असताना दिसला. स्टाफला त्याचा संशय आल्याने त्यास पाठलाग करून पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने वरील प्रमाणे असल्याचे समक्ष सांगितले.

त्यानंतर पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे कडील बारदाण्यात (गोणीत) 9 कोयते मिळून आल्याने ते पंचनाम्याने जप्त करण्यात आले. त्यानंतर त्यांचेकडे चौकशी करता तो स्वारगेट पो.स्टे. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले. त्यास कोयते बाळगण्याचे कारण विचारता, त्याने प्रतिस्पर्धी गुन्हेगाराकडून जीवाला धोका असल्याने त्याने स्व:संरक्षणार्थ जवळ बाळगल्याची कबुली दिली. चौकशीत त्याचा गुन्हेगारी उद्देश स्पष्ट झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध स्वारगेट पो.स्टे. CR No 14/23 आर्म ऍक्ट 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

त्याचेकडून तपासात आणखी इतर साथीदार अगर कोयते मिळण्याची दाट शक्यता असल्याने दाखल गुन्ह्याचा पुढील तपास Unit-2 प्रभारी व.पो.नि. क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली Unit-2 कडील PSI नितीन कांबळे व पोलीस अंमलदार करीत आहेत.

गुन्हेगाराचा पूर्वइतिहास
आरोपी अक्षय अप्पया कांबळे वय- 27 रा. स.न. 429/30, डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे हा स्वारगेट पो.स्टे. अभिलेखावरील सराईत सक्रिय गुन्हेगार असून शरीरविरुद्धचे अनेक गुन्हे त्याचेवर दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त, रामदास पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे, Unit-2, प्रभारी पो.नि. क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली API विशाल मोहिते, PSI नितीन कांबळे, पो अंमलदार शंकर नेवसे, गजानन सोनुने, निखिल जाधव, मोहसीन शेख, कादिर शेख, समीर पटेल, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख या पथकाने केली आहे.*

   
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular