सजग नागरिक टाइम्स:अजहर खान ,पुणे ; सोशल नेटवर्किंगच्या जगात सर्वकाही खुपच फास्ट झालेले आहे त्यात ऑनलाईन खरेदी विक्री, मनी ट्रान्स्फर, बिल भरणे, अश्या कामाला गती मिळत असुन त्या मध्ये आता फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे .त्यातीलच एक प्रकार पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट 1 यांनी आरोपीचे मुसक्या आवळून उघडकीस आणले आहे
नविन सिम कार्ड घेणाऱ्या लोकांचे नंबर प्राप्त करून घेऊन संबधित लोकांना फोन करून तुम्हाला लाॅटरी लागल्याचे सांगून व गोल्ड प्लेटेड असलेली अमरीकन चैन लागले असल्याचे सांगून त्यांचे विश्वास संपादन करून ५५० रुपये भरण्यास सांगून ७० रुपयाची एच एम टी कंपनीची बनावट घड्याळ त्याना लोकांना देऊन त्यांची फसवणूक करत होता .याबद्दल महेंद्र सोनावणे रा. संगमवाडी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने वैदिक बजार कंपनीचे मालक बालाजी रामचंद्र म्द्दीपाटला वय ३२ रा हिमालया हाईट्स फातिमानगर वानवडी यास सापळा रचून अटक करण्यात आले आहे, त्याच्या कडून ६५० एच एम टी कंपनीची बनावट घड्याळ, बनावट कंपनीची चैन असे ९०.००० रुपयाचा मुद्देमाल जमा करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले ,हि कारवाई प्रदीप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ,पंकज डहाने पोलीस उपायुक्त गुन्हे ,समीर शेख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १.यांच्या मार्ग्दर्श्नाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील ,स. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे,व इतर अधिकारी व कर्मचारीने मिळून कारवाई केली.