Homeताज्या घडामोडीसदनिकेची मालकीण असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी एका महिले विरोधात कोंढवा पोलीस...

सदनिकेची मालकीण असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी एका महिले विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल,

गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सजग नागरिक टाइम्स : पुणे : सदनिकेची मालकीणअसल्याचे भासवून तिचा लिव अ‍ॅन्ड लायसन्स करारनामा करून डिपॉझिट स्वरुपात साडे तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मिनाज मुर्तजा शेख (वय 36, रा. कोंढवा) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. ़एन. ओंडरे यांनी हा आदेश दिला.

याप्रकरणात, जमीर मोहम्मदीन शेख (वय 56, रा. गंज पेठ) यांनी अ‍ॅड. राशिद सिद्दीकी यांमार्फत न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली. जमीर हे भाड्याने घर शोधत होते. यावेळी, त्यांना कोंढवा परिसरात एक सदनिका असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, त्यांनी मिनाज शेख यांच्याशी संपर्क केला. मिनाज यांनी 1 बीएचकेसाठी डिपॉझिट स्वरुपात 3 लाख 50 हजार रुपये घेत लिव अ‍ॅण्ड लायसन्स करारनामा केला.

काही महिन्यानंतर संबंधित सदनिकेच्या मुळ मालकाने जमीर शेख यांना ही सदनिका आपली असल्याचे सांगितले. त्यानंतर, जमीर यांनी मिनाज यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शिवीगाळ करत धमकी दिली.

याप्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जमीर यांनी अ‍ॅड. सिद्दीकी यांमार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करत तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले.

न्यायालयाच्या आदेशाने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल सदरील महिले विरोधात 420,406,419,507 या कलमान्वये गुन्हा दखल करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. राशिद सिद्दीकी यांनी दिली असून पुढील तपास हे कोंढवा पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular