जागरूक पुणेकरांमुळे पुणे मनपाने काढलेले २८ लाख रुपयाचे टेंडर रद्द केले
Punekar news : मोफत होणाऱ्या दफनविधीला पुणे मनपा मोजणार होते २८ लाख रुपये
Punekar news : सजग नागरिक टाइम्स :
मोफत होणाऱ्या दफनविधीला पुणे मनपा टेंडर काढून 28 लाख रुपये मोजणार असल्याचे वृत्त पुणे शहरात वेगाने पसरले,
हि बातमी वाचून पुणेकर संतप्त झाले. या बद्दल शिवसेना , उम्मत फौंडेशन व
लोकहित फाउंडेशन ने आंदोलनाचा इशारा दिला होता,
कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मुस्लिम व ख्रिश्चन नागरिकांच्या दफनविधीसाठी मूल निवासी मुस्लिम मंच ही संस्था मोफत काम करीत आहे.
पुणे मनपाने टेंडर रद्द करावे म्हणून आज मूल निवासी मुस्लिम मंच ने पुणे मनपा समोर धरणे आंदोलन केले.
या आंदोलन मध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक अरविंद शिंदे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेल इक्बाल शेख , राहुल खुडे, विठ्ठल गायकवाड
इत्यादी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात येऊन पाठिंबा दिला.
वाचा : मोफत होणाऱ्या दफनविधीला पुणे मनपा मोजणार 28 लाख रुपये

सदरील प्रकरणी नगरसेवक रफिक शेख सोबत मूल निवासी मुस्लिम मंचच्या टीमने पुणे मनपा आयुक्त
व आरोग्य प्रमुख यांची भेट घेतली,
यावेळी मनपा आयुक्तांनी सदर निविदा रद्द करण्याचे आदेश संबंधीत विभागास दिलेअसून,
सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक रफिक शेख व अंजुम इनामदार यांनी दिली.
सय्यद नगर भागातील वाहन चोर पोलिसांच्या ताब्यात
Pingback: (pune police commissioner Order)पोलीस निरीक्षकासह 5 पोलिसांच्या वेतनवाढीला