मिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट

सजग नागरिक टाइम्स : पुणे: कोरेगाव भीमा येथे ०१ जानेवारी २०१८ रोजी दोन गटात जातीय तणाव झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, सदर घटणे बाबत कलम ३०७,१४३,१४७,२९५ (अ)४३६,११७,१५३ (अ)१२० (ब) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणां कायदा १९८९ व २०१५ चे तसेच आर्म अँक्टचे कलमान्वये शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे मीलींद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता.*शिवाजीनगर सत्र न्यायालयाने एकबोटे यांना  पकडण्याचे वाँरंट आज जारी केले. एकबोटे यांना अटक करण्याकरिता पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

खालील video पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

 

 

Leave a Reply