Death from COVID-19 : पुणे महानगर पालिकेच्या मदतीला सामाजिक संघटना मूलनिवासी मुस्लिम मंच आली धावून
Death from COVID-19 : सजग नागरिक टाइम्स : कोविड 19 या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाला हादरून टाकलेले आहे .
सदर रोग आपल्या या भारत देशात हि मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे,या रोगाने अनेक लोकांच्या मनात धास्ती निर्माण झालेली आहे.
मोठ्या प्रमाणात याची भीती लोकांच्या मनात असून सामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे.
वास्तविक पाहता जर सोशल डिस्टन्स चा तंतोतंत पालन केल्यास कोणतीच भीती नाही मात्र लोक या सोशल डिस्टनसिंगचा वापर करत नसल्याने अनेक लोकांना याचा संसर्ग होत आहे.
नुकताच पुण्यात या रोगाने ४३ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या आहेत.
नायडू हॉस्पिटल ससून हॉस्पिटल नोबल हॉस्पिटल यासारखे असे अनेक हॉस्पिटलमध्ये लोक या रोगा मुळे मृत्यू झालेले आहे.
जर कुणीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले असल्यास त्याला भेटण्याची ही परवानगी नाही,
व संचारबंदी असल्यामुळे कुणी अशा रुग्णांना नातेवाईक भेटू शकत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेले आहे .
भवानी पेठेतील सोनवणे हॉस्पिटल मधील दोन डॉक्टरांसह काही नर्स क्वारंटाईन..!
या रोगात मृत झालेल्या व्यक्तीला कुणीही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये भेटायला येत नाही , पुणे या ठिकाणी असे अनेक घटना घडल्या आहेत
मृत व्यक्तीच्या घरच्यांनी व नातेवाइकांनी मयत घेण्यास नकार दिल्याने अनेक अडचणी पुणे महानगरपालिकेसमोर निर्माण झाले.
अशा वेळेला समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक संघटना लोकांच्या मदतीसाठी व महानगरपालिकेच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत .
त्यापैकी पुणे येथील सामाजिक संघटना मूलनिवासी मुस्लिम मंच याही संघटनेने पुणे महानगर पालिकेला पत्रव्यवहार केला .
जर कुणी व्यक्ती कोरोना ने मयत झाली असेल अशी मयत आम्ही त्या धर्माच्या रीतीरिवाजा प्रमाणे त्याचा अंत्यविधी करू
असे पत्र देऊन महानगरपालिकेतर्फे अधिकृत मान्यता घेतली व संघटनेच्या माध्यमातून मुस्लीम धर्माप्रमाणे आजपर्यंत एकूण चार मयत दफन करण्यात आले.
मयत करताना राज्य सरकारने व महानगरपालिकेने दिलेल्या गाईडलाईन दिशादर्शक चे काटेकोर पालन करीत आहे.
दफनभूमी याठिकाणी जाताना पी.पी.ई किट महानगरपालिकेतर्फे देण्यात आले मयत झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटल मधून सरळ दफन भूमीत नेऊन दफन करण्यात आले ,
व त्यांच्या नातेवाईकांनाही कब्रस्तानात येण्यासाठी मनाई करण्यात आली
मयता चे अंत्यविधी पूर्णपणे धार्मिक पद्धतीने करण्याचे काम मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, अमजद शेख, साबिर शेख,
जमीर मोमीन , रमेश राक्षे , इरफान मणियार , बबलू पिरजादे ,शब्बीर काजीर,रियाज इनामदार इत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्या लोकांचे अंत्यविधी केले.
या रोगातून कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती मरण पावल्यास , त्या सर्वांचा दफनविधी ,अंत्यविधी त्याच्या धर्मानुसार करण्यात येईल ,
अंजुम इनामदार अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच यांनी महापालिकेला पत्र व्यवहार केले आहे अशी माहिती मिळाली .
फायनान्स कंपण्यांकडुन RBI चे आदेश धाब्यावर ? | Lockdown मध्येही बजाज Financeकडून सक्तिने वसुली सुरू