एका दिवसात मिळणार पॅनकार्ड

खुशखबर…

एका दिवसात मिळणार पॅनकार्ड

नवी दिल्ली – पॅन कार्ड काढण्यासाठी आता पूर्वीसारखं महिनाभर थांबण्याची गरज नाही. आता केवळ एका दिवसात तुम्हांला पॅन कार्ड मिळणार आहे.

आयकर विभागाने 31 मार्च 2017 पर्यंत 19,704 नव्या कंपन्याना एका दिवसात पॅन कार्ड दिले आहे. पॅनसोबत विभागाने ईलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड (ई-पॅन) देणे चालू केले आहे. या पॅन कार्डला लोकांच्या ईमेलवर पाठवले जाऊ

शकते. डिजिटल साईन केलेले

ई-पॅनला ओळखपत्र म्हणून दिले जाईल. आयकर विभागाच्या सर्वोच्च बॉडी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्‍सने (सीबीडीटी) ही माहिती दिली आहे.

आयकर विभागानूसार, या कंपन्याना पॅनसोबतच टॅन (टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर) दिले जाईल. यासाठी सीवीडीटीने कॉर्पेारेटने मंत्रालयासो

बत करार केला आहे. कंपनी पॅन आणि टॅनसाठी साधा फॉर्म भरून घेईल. नवीन कंपनीच्या सर्टिफीकेट ऑफ इनकॉर्पेारेशन (सीओआई) मध्ये पॅनसोबत कॉर्पेारेट आडडेटिटी नंबरचा (सिन) उल्लेख होतो.

Leave a Reply