अखेर निर्भयाच्या दोषींना दिली फाशी
Nirbhaya rape case : अखेर निर्भयाच्या दोषींना दिली फाशी ,सात वर्षांनी निर्भयाला मिळाला न्याय

Nirbhaya rape case : सजग नागरिक टाइम्स : नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील 4 हि दोषी
पवन गुप्ता,मुकेश सिंह,विनय शर्मा, विनयकुमार सिंह यांना आज पहाटे 5.30 वाजता दरम्यान तिहार जेल मध्ये फासावर लटकावण्यात आले,
भारतात एकाच वेळी 4 जणांना फासावर लटकावण्याची हि पहिलीच वेळ आहे.
तिहार जेल मध्ये 3 क्रमांकाच्या तुरुंगात यांना आज फाशी दिली गेली . त्यांना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर मधून दोर मागविण्यात आले होते.
त्या चारही दोषींना पाच मार्च रोजी फाशी देण्याचा चौथा डेथ वॉरंट काढताना न्यायालयाने
वीस मार्च रोजी पहाटे 5.30 वाजताची फाशी देण्याची वेळ निश्चित केली होती.
चालू वर्षात 22 जानेवारी ,1 फेब्रुवारी व 3 मार्च रोजी त्या चारही दोषींना फासावर लटकविण्यासाठी
काढण्यात आलेले डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटा मुळे निष्प्रभ झाले होते.
या चारही दोषींना फासावर लटकविल्यामुळे देशात नागरिकांनी आनंद व्यक्त केले तसेच अनेकांनी मिठाई हि वाटली .
Pingback: ( Bhavani peth latest news ) रात्री डांबरीकरण केले व सकाळी खोदले