भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंताने निलंबनाचे ऐकताच आला हृदयवीकाराचा झटका!
(Bhavani Peth Regional Office) काहि तासा पुर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
(Bhavani Peth Regional Office) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बिलांमध्ये काही अफरातफरचा प्रकार केल्याचा आरोप भवानी पेठेतील प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेवकाने केला होता.

तर त्या संदर्भात पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती.
त्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील २ कनिष्ठ अभियंते व १ उप अभियंता यांची चौकशी सुरू होती.
त्या संदर्भात परिमंडळ ५ चे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी अहवाल सादर केला होता.
वाचा : पुण्यातील ३८ रेशनिंग दुकानदारांनी अनामत रक्कम भरली नसल्याचे उघड !
त्या अनुषंगाने आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील महिला कनिष्ठ अभियंता सिमरन पिरजादे व शिवाजी गायकवाड आणि उप अभियंता बाळासाहेब टुले यांना निलंबित करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली.
निलंबनाची बातमी वा-या सारखी पसरली.
तर निलंबन झाल्याचे ऐकुन कनिष्ठ अभियंता शिवाजी गायकवाड यांना मानसिक धक्काच बसला त्यातुन त्यांना हृदयवीकाराचा झटका आला त्यांना औंध येथील एम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले
परंतु ते मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सध्या भितीचे व घबराटीचे वातावरण आहे.
तर शिवाजी गायकवाड यांच्या अचानकपणे जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाचा : कासेवाडीत 2 सराईत गुन्हेगारासह 1 तडीपार गुन्हेगार हत्यारासह पोलिसांच्या जाळ्यात
Pingback: (pune crime branch) सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार झालेले आरोपी...
Pingback: (crime branch arrested criminals) गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार आरोपी...
Pingback: (Zomato and Swiggy Delivery boy arrested ) झोमॅटो व स्वीगीच्या डिलेव्हरी बॉय.