आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा ‘
‘International Yoga Day‘:आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

International Yoga Day :दोन हजार विद्यार्थी –विद्यार्थिनीकडून योग प्रात्यक्षिके सादर
सजग नागरीक टाइम्स :पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे शुक्रवार,
दिनांक २१ जून रोजी सकाळी साडेसात वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी International Yoga Day निमित्त दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर केली .
एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक गुलझार शेख ,प्राध्यापक ,शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते .