मस्जिद बाहेर भीक मागणा-या 40 भिका-यांची रवानगी येरवडा सुधारगृहात

सजग नागरिक टाइम्स:कोंढव्यातील कौसरबाग मस्जिद, तालाब मस्जिदच्या बाहेर भीक मागणा-या आणि स्थानिक रहिवाशी आणि रहदारीस अडथळा निर्माण करणा-या 40 भिका-यांवर कारवाई करून त्यांची रवानगी येरवड्यातील सुधारगृहात करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (3 नोव्हेंबर) दुपारी 1.30 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 
[metaslider id=2853] पोलीस उपआयुक्त दीपक साकोरे यांनी सार्वजनिक चौकात, धार्मिक स्थळाजवळ भीक मागणा-या व स्थानिक रहिवाशांना व रहदारीला अडथळा निर्माण करणा-या भिक्षेक-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी 15 पोलीस कर्मचा-यांच्या सहाय्याने ही कारवाई केली. यापूर्वीही 21 भिका-यांवर अशाप्रकारे कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply