टिळक रोड येथील kothari wheelsचा परवाना 30 दिवसासाठी निलंबित

टिळक रोड येथील kothari wheelsने विना पासिंग ची वाहने ग्राहकांना दिल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाने (RTO)ने परवाना 30 दिवसासाठी निलंबित केला आहे.


याबद्दल नरेश ठक्कर ने सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांच्या द्वारे 25 जानेवारी रोजी तक्रार केली होती,त्या अनुषंगाने Rto ने kothari wheelsला नोटीस बजावून खुलासा मागितला होता.

कोठारी व्हील्स ने खुलासा न दिल्याने,सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी कोठारी व्हील्सचा परवाना 1 मार्च पासून 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे .

यापूर्वी ही kothari wheelsचा परवाना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला होता.


एखाद्या ग्राहकाने शोरूम मधून नवीन गाडी विकत घेतली असता त्या वाहनांची जोपर्यंत rto मध्ये नोंदणी होऊन गाडी नंबर येत नाही तो पर्यंत वाहन गाडी मालकाला देेेता येत नाही, विना पासिंग गाडी चालवल्यास काही अपघात झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही,व गाडी पोलिसांनी धरल्यास त्याचा भुर्दंड देखील वाहन चालकाला भोगावा लागतो,व गाडी पासिंग होण्यापूर्वीच गाडीचे हप्ते चालू होतात.

या सर्वांमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानेअँटी करप्शन स्कोडचे संस्थापक वाजिद खान यांनी rto ला तक्रार करून पाठपुरावा केल्याने कोठारी व्हील्सला हा दणका बसला आहे.

Leave a Reply