हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर!

Advertisement

Ideal English School : शाळेच्या वेळेत विध्यार्थ्यांची देखरेख व सुरक्षेची जबाबदारी हि सर्वस्वी शाळेचीच असून शाळेने विध्यार्थ्याचा औषधोपचाराचा खर्च उचलावा,

One of the most serious of students in the Ideal English School

जर शाळा प्रशासन आपले हात झटकत असेल तर शाळेच्या ट्रस्टी व मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊ शकतो ?

Ideal English School : सजग नागरिक टाईम्स |पुणे हडपसर सय्यदनगर, गुलाम अलीनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वादविवाद भांडणे होत असतात

काहि भांडणे पालक मध्यस्थी करून मिटवतात तर काहि स्थानिक नागरिक .

दोन दिवसापूर्वी आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकणा-या 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत भांडणे झाली,

ती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली कि अमान सिद्दीकी या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला एका खाजगी रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले,

One of the most serious of students in the Ideal English School
इतर बातमी : Shafi inamdar च्या अल जदीद उर्दू highschoolच्या Stundent वर अत्याचार

विद्यार्थ्याच्या पालकाने त्याची हालत गंभिर असल्याचे सांगितले.या विद्यार्थ्यांमध्ये झालेला वाद पार पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचलेला आहे.

Advertisement

राशीद सिद्दीकीचा मुलगा हा गंभीर जखमी झाल्याने त्यांनी भावनेच्या भरात शाळेत जाऊन त्या चारपाच विध्यार्थीना मारहाण केली ,

मारहाण केल्याने त्या विद्यार्थ्यांनच्या पालकांनीही महम्मदवाडी पोलिसात धाव घेतली , यासर्व प्रकारामुळे विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,

तसेच विद्यार्थ्यांनच्या पालकांनी परस्पर विरोधात पोलिसात तक्रारी केली असल्याचे समजते.

मात्र शाळेतील मुख्याध्यापक व संस्था चालक हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन सर्व प्रकार पाहत असल्याचे व जबाबदारी झटकत असल्याचे पालकांनी सांगितले,

सदरिल शाळेत सीसीटीव्ही केमेरे लागलेले असून त्याचे फुटेज शाळा पोलिसांना देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पालकांनी सांगितले.

सदरील शाळेने विध्यार्थ्यांचा खर्च उचलण्याची मागणी पालकांनी केली आहे.

शाळेत असे प्रकार घडणे गंभीर आहे असे प्रकार रोखण्याचे काम मुख्याध्यापकाचे आणि संस्था चालकांचे आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश दिले जाईल व दोषी आढळणा-या विरोधात कारवाई केली जाईल, डाॅ गणपत मोरे : शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे

कोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Share Now