पुण्यात कुत्रा हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल.

सजग नागरिक टाइम्स : पुणे, दि.३१ :पुणे शहरात सध्या एका विषयाला चर्चेला उद आला आहे कि हडपसर भागात एका व्यक्तीने कुत्रा हरवल्याची तक्रार पोलिसात नोद्वली आहे.
 

ही बातमी कळताच नागरिकांच्या तोंडून एकच निघत आहे कि शहरात हरवलेली माणसे सापडत नाही त्या ठिकाणी हरवलेले कुत्रे काय सापडणार ? सध्या पाळीव प्राण्यांना चांगलाच भाव आलेला असून, आताचे सरकार आल्यापासून गायीची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत असताना आता , त्यावरून अनेक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले असताना सध्या जनावरे ,चपली ,हरवण्याच्या ही तक्रारी पोलिसात नोंद होताना ऐकू येत आहे. आता पुण्यात कुत्र्याचे अपहरण झाल्याच्या संशयातून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सदरील कुत्र्याचा शोध घेत आहे,याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे (रा.फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्याच्या अपहरणाची तक्रार दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
सदरील कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा असून, त्याचे नाव ‘टायसन’ असे होते. मात्र रविवार (दि.२२) पासून तो सोनार पूल, फुरसुंगी येथील नितीन शिंदे यांच्या घरातून बेपत्ता झाला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून काही व्यक्ती नितीन शिंदे यांना कुत्रा आम्हाला विका असे म्हणून मागणी करत होते. मात्र शिंदे यांनी त्यांना नकार दिला होता. त्यामुळे त्यातीलच कोणीतरी टायसनचे अपहरण केले असावे कुत्रा चोरला असावा असा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply