रेशनिंग दुकानदाराला 3 लाख 16 हजाराचा दंड

सजग नागरिक टाइम्स; अजहर खान ;पुणे शहरात रेशनिंग धान्याचा काळाबाजार होत असल्याचे सारखेच बोलले जाते आणि अधिकारी यांच्यावर हि नेहमी ताशेरे ओढले जाते हे नेहमीचेच ऐकायला येतात. परंतु काहि अधिकारी यांचा रेशनिंग धान्य दुकानदारांवर वचक असल्याने कारवाई देखील होतात .येरवडा येथील स्वत धान्य दुकानदाराला अधिकारी यांनी मोठा झटकाच दिला, येरवडा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार बी एल दिघे परवाना क्रं ई 83 या दुकानदारा विरोधात अनेक तक्रारी शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने फिरते पथकाचे सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे व फ परिमंडळ विभागातील अधिकारी यांनी अचानकपणे दिघे याच्या स्वत धान्य दुकानात भेट दिली असता अनेक अनागोंदी कारभार दिसून आले.
[metaslider id=2853] अधिक तपासणी केली असता सदरील दुकानदार नियम धाब्यावर बसवून ई पाॅझ मशिनीद्वारे धान्य वाटपच करत नसल्याचे दिसून आले. मंजूर केलेल्या धान्या पैकी गहू आणि तांदूळ मध्ये मोठ्या प्रमाणावर तफावती आढल्या तसेच सदरील गहू आणि तांदूळ बाबतीत सदरील दुकानदार दिघे याला नोटिस बजावून खुलासा मागण्यात आला होता. दुकानदाराने खुलासा असमानधारक सादर केल्याने तत्कालीन अन्न धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत दिघे याचा परवाना रद्द करत चालू बाजार भावा प्रमाणे गहू आणि तांदूळाचे 3 लाख 16 हजार 65 रूपये वसुल करण्याचे आदेश पारित केले आहे
*दुकानदारांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच ई पाॅझ मशिनीद्वारे धान्याचे वाटप करावे पुण्यातील काहि दुकानांची यादी आमच्याकडे प्राप्त झाली आहे लवकरच त्यांच्या वर हि कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे*
रघुनाथ पोटे
सहायक अन्न धान्य वितरण अधिकारी ( फिरते पथक)

Leave a Reply