पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंची मनसेतुन हकालपट्टी करण्यात आलीआहे .
वसंत मोरे हे गेल्या वर्षभरापासून पुण्यात मनसेच्या शहराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.
परंतु , गुरुवार दि . ७ एप्रिल रोजी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साईनाथ बाबर यांना पुण्याच्या शहराध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
मस्जिदवरील भोंगे उतरवण्याबाबत वसंत मोरे आणि समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पहायला मिळत आहे .
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंगे बाबत केलेल्या वक्तव्याला अप्रत्यक्षरीत्या विरोध करत वसंत मोरे यांनी मनसेला घरचा आहेर दिला होता .
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मतदारसंघात असंतोष निर्माण होत आहे ,
त्यामुळे मी माझ्या मतदारसंघात लाउडस्पीकर वरून हनुमान चालीसा लावणार नाही ‘ , असं म्हणत वसंत मोरे यांनी राज यांनी पुकारलेल्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता .
दरम्यान , याच पार्श्वभूमीवर राज यांनी गुरुवारी पुण्यातील मनसे पदाधिका-यांना मुंबईतील निवासस्थानी बैठकीसाठी बोलावले होते . यावेळी वसंत मोरे यांना निमंत्रण नसल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विरोध केल्यामुळेच वसंत मोरेंना अध्यक्ष पदावरून दूर केल्याचे बोलले जात आहे . दरम्यान , मी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याची भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे .
साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीवर वसंत मोरेंचं ट्वीट
वसंत मोरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!”असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे.