Homeताज्या घडामोडीअयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,

Ram mandir Issue: अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – ऍड.प्रकाश आंबेडकर

The Ayodhya Ram mandir verdict was based on emotions not facts adv prakash ambedkar

Ram mandir Issue: जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे.मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही: प्रकाश आंबेडकर

Ram mandir Issue: सजग नागरिक टाइम्स : मुंबई,पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते.

मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

राहुल सांस्कृत्यांन हे इतिहासकार आहे. त्यांनीही सांगितले आहे की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते.

अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला.परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला.

सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला.

अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती.

या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे.

राममंदिर भूमीपूजना वरून नवा वाद:बारामतीत आंदोलन

मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो,

असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते.

कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता.

मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल,

असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular