सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते
The taste of power : शिवसेनेने चालू केलेला ‘संसार’ मोडून तुमच्या सोबत यायचं का?

The taste of power : सजग नागरिक टाइम्स : पुणे: सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते.
तुम्ही आजही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायला तयार आहात. मात्र शिवसेनेने चालू केलेला ‘संसार’ मोडून तुमच्या सोबत यायचं का?
असा सवाल संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी विचारला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतचा शिवसेनेचा राजकीय ‘संसार’ तुम्ही मोडायचे कितीही प्रयत्न केले. तरीही तो मोडणार नाही अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे.
VIDEO : महायुतीतील इतर घटक पक्ष तुमच्या बैलगाडीत बसलेले आहेत त्यांचं काय ?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आता राज्यात स्वतंत्र (स्वबळावर) निवडणूक लढवायची असे जाहीर केलेले आहे, मग महायुतीतील इतर घटक पक्ष तुमच्या बैलगाडीत बसलेले आहेत त्यांचं काय?
मग त्यांनी बैलगाडीतून उतरून बैलगाडीच्या खाली चालायचं का? हा प्रश्न आहे.
कुरघोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातील सत्तांतर (पाडापाडीचे राजकारण) कृपया कोरोना महामारीच्या संकटात करू नका.
सध्या माणसाला जगू द्या. अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली.
कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याने भीम आर्मीचे बेड आंदोलन
Pingback: (MLA Chandrakant Patil) आमदार चंद्रकांत पाटलांच्या नावाने नागरिकांना पुन्हा गंडा
Pingback: (Ram mandir )अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,