Homeताज्या घडामोडीअल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील कोंची येथील एक अल्पवयीन तरुणी व तिच्या मैत्रिणीलाही काळ्या पिवळ्या रंगाच्या जीप चालकाने पळवून नेत अपहरण केल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती.

या अपहरणाचा तपास आश्वी पोलिसानी लावत राजु ईलियास शेख व सोनु उर्फ स्वप्नील दादु बागुल या दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे

संगमनेर येथे इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली कोंची येथील अल्पवयीन तरुणी व सिन्नर तालुक्यातील तिची मैत्रीण या दोघीनी बारावीची परीक्षा संपल्याने लोणी ता. राहता येथे सी.ई.टी क्लास लावले होते.

या दोघी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने प्रवास करत सोमवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी न आल्याने त्याच्या पालकानी लोणी येथील क्लास चालकास दूरध्वनी वर विचारले असता त्या क्लासला आल्या नसल्याचे समजले .

तिच्या मैत्रीणीच्या घरी विचारणा केली मात्रं त्या तेथे नसल्याचे समजल्याने? पालकानी नातेवाईक व इतर ठिकाणी चौकशी करत असताना त्याना राजु ईलियास शेख व सोनु उर्फ स्वप्नील दादु बागुल दोघे रा. लोणी ता. राहता या दोघांच्या काळ्या पिवळ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने या दोघी प्रवास करत असल्याचे कळाले.

तर राजू व सोनुच्या घरी चौकशी केली असता ते दोघे ही घरी नसल्याचे लक्षात येताच अल्पवयीन मुलीच्या आईने आश्वी पोलीस स्टेशन गाठत राजु शेख व सोनु उर्फ स्वप्नील दादु बागुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यावेळी आश्वी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश कामाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सुत्रे हाती घेत उपनिरीक्षक भिमराज शिंदे यानी सापळा रचत वेळो-वेळी आरोपीच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेतली.

आरोपी पुणे येथिल शिवाजीनगर येथे असल्याचे कळाल्याने शिदे यानी पोलीस हवालदार पाडूरंग कावरे, भारत जाधव, माधव खाडे व गुप्त वार्ता विभागाचे अनिल शेंगाळे याना बरोबर घेत पळण्याच्या तयारीत असलेले आरोपी राजु ईलियास शेख व सोनु उर्फ स्वप्नील दादु बागुल याना ताब्यात घेत दोन्ही मुलीची त्याच्या तावडीतून सूटका करत त्याच्या पालकाकडे सोपवल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular