आता वाहतूक पोलीस गाडी जप्त करणार नाही

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

*वाहतूक पोलीस गाडी जप्त करणार नाही

* *उपायुक्त अशोक मोराळे यांचे आश्वासन*
सजग नागरीक टाईम्स ..प्रतिनिधी
पुणे, गेल्या काही महिन्यांपासून ई चलन द्वारे दंडाची वसुली करण्याचे काम पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आले होते त्या ई चलन मशिनि मुळे वाहतूक पोलीसांचा भ्रष्टाचार कमी झाल्याचे हि बोलले जात आहे परंतु ई चलन मशिनचा सर्वर वारंवार डाऊन होत असल्याने वाहतूक पोलीस व नागरीकांची कुचंबणा होत होती. काहि लोकांचे वाहन क्रंमाक घेऊन नंतर दंड भरून घेतले जात होते .थोडे थोडे म्हणता कोट्यवधी रुपयांची दंडाची थकबाकी झाली असल्याने पोलीसांनाच गंडा घातले अशी चर्चा होत असल्याने वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी सरकुलर काढून दंड वसुलीचे आदेश पारित केले होते. परंतु काही वाहतूक पोलीसांनी याचा गैरफायदा घेऊन थेट वाहनेच जप्त करून घेण्याची नामी शक्कल लढवली होती त्याचा फटका नागरीकांना बसत असल्याने तक्रारी लोकहित मोटरसायकल संघटना चे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांच्या कडे प्राप्त होऊ लागल्याने अजहर खान यांनी दि 4/4/2018 रोजी वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांची भेट घेऊन समक्ष चर्चा करून वाहने जप्त करण्याची नामी शक्कल लढवणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली त्याची दखल घेत अशोक मोराळे यांनी दंड न भरलेल्या वाहने जप्त करू नये असे आदेश सर्व वाहतूक विभागाच्या् प्रभारी अधिकारी यांना दिले असल्याचे अजहर अहमद खान यांनी सजग नागरीक टाईम्स शी बोलताना व्यक्त केेले

Advertisement

 

Advertisement

Leave a Reply