पिंपरी चिंचवड : किडलेल्या दाढेचं रुट कॅनल करताना पोटात सुई गेल्याने 7 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव धोक्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये डी वाय पाटील दंत रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
काल सकाली १०च्या दरम्यान आदिराज भास्कर माळी या 7 वर्षांच्या चिमुरड्याचं रुट कॅनल सुरु होतं. त्यावेळी ड्रीलमधून सुई निसटली आणि आदिराजच्या पोटात गेली. मुलानं याबाबत पालकांना सांगितल्यानंतर त्याचा एक्सरे काढण्यात आला. एक्सरेमध्ये ही सुई स्पष्टपणे दिसत आहे.सुई पोटात गेल्याचं रुग्णालयानं मान्य केलं असून आदिराजवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असं आश्वासन रुग्णालयाकडून देण्यात आलेल आहे.
किडलेल्या दाढेचं रुट कॅनल करताना चिमुरड्याचा पोटात गेली सुई
RELATED ARTICLES