खडक पोलीसांकडून चार जणांवर मोकका अंतर्गत कारवाई

खडक पोलीसांकडून मोकका अंतर्गत कारवाई..

सनाटा प्रतिनिधी ; पुणे शहर हे विद्येचे  माहेर घर ओळखले जाते यात गुन्हेगारांची संख्या हि जास्त, परंतु काहि पोलीसांच्या खाक्यामुळे आता गुन्हेगारांवर थोडेफार तरी जरब बसत आहे .खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत अब्दुल गनी खान वय 34 (घोरपडे पेठ) अक्षय राजेश नाईक वय 28 (घोरपडे पेठ) अक्रम नासिर पठाण वय 27 (औंध ) अक्षय अंकुश माने वय 23 (घोरपडे पेठ ) या चौघांवर मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन त्या चौघांना जेरबंद करण्यात आले आहे .त्यांच्या वर घरफोडी, धमकावणे, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घर बळकावने , दहशत माजवणे, दरोडा, मारामारी, या सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांनी संघटीतरित्या  गुन्हे केल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरूद्ध पोलीस उपायुकत परिमंडल 1 बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेन्द्र मोकाशी व संभाजी शिरके, पोलीस निरिक्षक( गुन्हे ) तपास पथकाचे पो उप निरिक्षक आनंत व्यवहारे, संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबार,यांनी मिळून प्रस्ताव तयार केला होता त्यावर शिक्का मोरबत रविंद्र सेनगावकर अप्पर पोलीस आयुकत दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3 (2)3 (4) प्रमाणे कारवाई आदेश पारित केले आहे त्या नुसार सर्व आरोपी विरोधात मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास शहर विभागाचे सहायक पोलीस आयुकत बाजीराव मोहिते हे करत आहेत,

Leave a Reply