ताज्या घडामोडी

गौरक्षकांवर कारवाई करण्याचे मोदिंनी दिले आदेश

Advertisement

गौरक्षकांवर कारवाई करण्याचे मोदिंनी दिले आदेश
गौरक्षकाच्या नावावर हिंसाचार करणाऱ्या गौरक्षकावर कडक कारवाई करा.कोणासही कायदा हातात घेऊ देऊ नये,नरेंद्र मोदींनी असे आदेश सर्व राज्यांना दिले आहे .आज सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पावसाळी अधिवेशना निमित्त बोलवण्यात आली होती. यावेळी कथित गौरक्षकांवर कठोर कारवीची ग्वाही नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिली.कायदा सुव्यवस्था राखणे हि राज्यांची महत्वाची जबाबदारी आहे .या अनुषंगाने सर्व राज्यांना सूचना देण्यात आलेले आहेत .कथित गौरक्षकाच्या हुल्लडबाजीचे राजकारण सुरु असून ते थांबले पाहिजे त्यातून कोणालाही काहीही साध्य होणार नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘गोमातेचे रक्षण व्हावे हि देशातील नागरिकांची भावना आहे . पण त्यासाठी देशात कायदापण आहे कायद्यात राहूनच ते झाले पाहिजे .त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये ते खपून घेतले जाणार नाही .सर्व राज्य सरकारांनी याबद्दल दक्षता ठेवावी असे नरेंद्र मोदी म्हणाले .केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी माहिती दिली.
 

Advertisement

Share Now

Leave a Reply