पालक मंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल केली तयार.

गिरीश बापट यांच्या नावाचे बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करणाऱ्याला  अटक.
सनाटा प्रतिनिधी ; आज फेसबुक म्हणजे  नव्या पिडिसाठी मनोरंजनाचे साधन बनले आहे .कोणी उठून काय फेसबुकवर अपलोड करेल याचा अंदाजा धरता येणार नाही. भलताच  एक प्रकार पुणे जिल्हयातील पालकमंत्री तथा अन्न धान्य पुरवठा मंत्री यांच्या बाबतीत  घडला .गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक अंकाऊट तयार करून थेट बापट यांचे फोटोचा वापर करण्यात आला  व त्या अंकाऊट वरून काहि महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे टॅग झाल्याचे आढळून आले बापट यांचे माध्यम सल्लागार यांनी सायबर क्राईम सेल कडे तक्रार केली .त्याची दखल घेत बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) प्रमाणे आरोपी त्रुतुराज सावरकर नलावडे वय 30 याच्या वर गुन्हा दाखल करूण अटक करण्यात आली आहे .सदरील आरोपी ने आणखीन काहि बनावट अंकाऊट तयार केल्याचे निष्पन्न होत आहे का .त्याचा नेमका  हेतू काय होता, या संदर्भात आधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply