सनाटा प्रतिनिधी : पुणे शहरातील पीएमपीएमएल बस चालक व कंडकटरचा मुजोर पणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नागरिकांनशी अरेरावी, उधट वर्तन, प्रवाशांना बस मधुन उतरण्या आधिच बस पुढे नेने, अशिक्षीत नागरिकांना अपमाणित करणे, महिलांन सोबत हुज्जत घालणे, असे एक ना अनेक प्रकार आज रोजी घडत आहे त्यातीलच एक प्रकार नविन जिल्हा अधिकारी कार्यालय समोर घडला दि 1 ऑगस्ट 2017 रोजी वेळ सायंकाळी 6 वाजता एक ज्येष्ठ पुढच्या दारातून बसमध्ये चढले त्यांना बस चालक ने मागील दारातून बसवर चढण्यास सांगितले परंतु जेष्ठ नागरिकाला दम लागल्याने ते काही खाली उतरले नाही .याचा राग मनात धरून चालक व कंडक्टर ने हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यास सुरु केले. ज्येष्ठ नागरिकाला पीएमपीएमएल बस चालकाने व कंडेकटरने मिळून मारहाण केली .त्या ज्येष्ठ नागरिकाची चुक ऐवढीच होती कि त्यांनी त्याचे ऐकले नाही . त्यावरून त्या ज्येष्ठ नागरिकाला बस मधुन बाहेर आणून शिवागाळ करत गचंडी धरून मारहाण केली .पीएमपीएमएल ला शिस्त लावणारे व अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर वचक बसविणारे तुकाराम मुंडे अश्या गुंड प्रवृत्तीच्या चालक व कंडेकटरवर मारहाण केल्या प्रकरणी निलंबणाची कारवाई करतील का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत..
पुणे :पी .एम. पी.एल बस चालक व कंडकटरची ज्येष्ठ नागरिकाला मारहाण.
RELATED ARTICLES