प्लास्टिकमुळे कचरा कूंडया झाल्या ओव्हरफुल

सजग नागरिक टाइम्स :  नवी सांगवी येथील मयूर नगरीसमोरील कचरा कुंडी ओसंडून वाहत आहे.  नागरिकांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिवसातून दोनदा कचरा उचलण्यासाठी वारंवार विनंती केली. परंतु कचरा  सकाळी 8 वाजता उचलला जातो व  नंतर उपनागरातून घंटा गाड्याही कचरा आणून तेथेच टाकत असतात  .शेवटी संध्याकाळी आजूबाजूच्या सोसायट्याचा कचरा तेथेच टाकला जातो .आणि भाजी विक्रेतेही त्या ठिकाणी सडलेली भाजी तेथेच टाकत असतात  .हॉटेल वाले रात्री 11 नंतर ही कचरा त्याच कचरा कुंडी त टाकत असतात  त्यामुळे  कचरा कुंड्या ओसंडून वाहतांना दिसत आहे .
सकाळी कावळे, कुत्रे, तसेच मोकाट जनावरे त्या ठिकाणी गर्दी करून येथेच्छ भोजन करतात त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

.
नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 7 वा क्रमांक तर पुण्याने अकराव्या क्रमांकावरून 10 क्रमांकावर झेप घेतली. परंतु पिंपरी चिंचवड पालिका  9 व्या क्रमांकावरून 43 व्या क्रमांकावर फेकली गेली यावरून प्रशासन किती गांभीर्याने याचा विचार करत आहे  हे लक्षात येते.सकाळी माँर्णिगवाकला  जाणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला  व घाणीच्या वासामुळे नाक दाबून  पळ काढावा  लागतो. प्लास्टिकमुळे कचरा कूंडया झाल्या ओव्हरफुल सध्या शासनाने प्लॅस्टिक बंदी घातली आहे त्यामुळे नागरिक रात्री उशिरा प्लास्टिक पिशव्यामध्ये कचरा  टाकतात .दिवसातून दोनदा कचरा उचलण्यासाठी व भटके कुत्र्यासंबधी  कायम स्वरूपी तोडगा काढावा  म्हणून  मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनीआयुक्तांना  निवेदन देऊन मागणी केली .
यावेळी विकास शहाने , अँड. सचिन काळे, सौ. संगिता जोगदंड ,मुरलिधर दळवी,अंबरनाथ कांबळे   हे उपस्थित होते .

 

 

Leave a Reply