लेख

मेहनत करने वालो के पैसे वक्त पर नही दिया तो मुझे भी रिक्षा चलाना पडेगी

Advertisement

पाच वर्षा पूर्वी एका व्यापार्याची इन्कम टॅक्स विभागाद्वारे चौकशी सुरु झाली होती , तो माझ्या कडे आला तेव्हा रडत होता , मी माझे सर्व कौशल्य पणाला लावून त्याला इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या सत्तर लाख रुपयांच्या मागणी ची केस सुमारे वर्ष भर लढलो … अंतीमतः कुठलाही अतिरिक्त खर्च न होता फक्त ५ हजार रुपये भरल्यावर ती केस सुटली , चौकशी बंद झाली …
फी मागितल्यावर उद्या येतो, पर्वा येतो म्हणून वेळ काढली नंतर मी पैसे मागणे बंद केले मोठा व्यवसाय होता , पाच सहा आलिशान कार स्वतःच्या वापरा साठी होत्या …
मी आजारी असल्याने काल तपासणी साठी गेलो होतो .. चक्कर येत असल्यामुळे दुचाकी दवाखान्या समोरच लावली आणि रिक्षा ने घरी गेलो , उतरून भाडे विचारले तर रिक्षावाला म्हणाला ‘का ओ वकील साहेब लाज काढताय माझी , माझ्या लक्षात आहे मी तुम्हाला पैसे देणे लागतो’ तोच व्यापारी होता .. मी सुन्न झालो … मी खरंच ओळखले नव्हते , भागीदाराने धोका करून पळून गेला .. असे काही म्हणाला . मी ५० रुपयांची नोट त्याच्या खिश्यात कोंबली … मेहनत करने वालो के पैसे वक्त पर नही दिया तो मुझे भी रिक्षा चलाना पडेगी … असे म्हणून घरी आलो … पण अजून तो सिन काही डोक्यातून जात नाहीये ..

Advertisement

तातपर्य. माणसाणे नेहमी व्यवहारात प्रामाणिक असावे .

लेखक .advocate समीर शेख .  

पुणे.

Share Now

Leave a Reply