शिक्षण संचालक कार्यालयामध्ये तोडफोड
पुणे : पुणे स्टेशन जवळील सेन्ट्रल बिल्डींग मधील महाराष्ट्र शिक्षण संचालक कार्यालयावर अखिल भारतीय विध्यार्थी परिषद चा मोर्चा आला होता .विध्यार्थी परिषदचे कार्यकर्ते मोठ्या संखेने घोषणा देत सेन्ट्रल बिल्डींगमध्येशिरले व शिक्षण संचालक धनंजय माने याचा नावाचे नामफलक तोडून फेकून दिले तसेच धनंजय मानेच्या केबिनचे दार उस्कटून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असून दारेचे बिजागरे खिळ्या सहित बाहेर येऊन बाहेर लटकत होते .तसेच अखिल भारतीय विध्यार्थी परिषदचे कार्यकर्ते धनंजय माने यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले असल्याचे संचालक कार्यालयाकडून सांगितले असून बंगारडन पोलीस स्टेशनमध्ये अखिल भारतीय विध्यार्थी परिषदच्या ३२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे